spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एलॉन मस्क यांनी केलेल्या कारवाईनंतर ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी मागितली माफी

ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे . तर एलॉन मस्क यांना जगातील सर्वात बुद्धिमान आणि यशस्वी उद्योजग म्हणून ओळखले जाते. एलॉन मस्क यांची विचार करण्याची पद्धत आणि तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतरांपेक्षा जरा वेगळा आहे असे म्हटले जाते . एलॉन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच ट्विटरच्या सगळ्या नियमांमध्ये बदल केले आणि ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावर ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी ट्विट करत म्हटले आहे कि सध्याच्या परिस्थितीसाठी ते स्वतः जबाबदार आहे. तसेच जॅकला माहित आहे की, बरेच लोकांचा त्यांच्यावर ‘राग’ आहेत. कंपनीमध्ये खूप वेगाने बदल केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे

मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरने जगभरातून कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केलीअसल्याचे अहवाल विविध ठिकाणांहून आले आहेत . ट्विटर इंडियाच्या कार्यालयातही कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली असून अनेकांनी दावा केला आहे की सुमारे ८५ टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयावर भाष्य करताना मस्क यांनी सांगितले कि ट्विटरला दररोज ४ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होत असल्याने त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता असे अब्जाधीश एलोन मस्क यांनी सांगितले. तर या संपूर्ण प्रकारावर ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जॅक डोर्सी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये असे लिहिले आहे कि, ट्विटरचा भूतकाळ व वर्तमान कठीण आणि परिवर्तनीय आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांना नेहमीच मार्ग सापडतो. मला जाणवलंय की, अनेक लोक माझ्यावर नाराज आहेत. प्रत्येकजण सध्या ज्या स्थितीत आहे, याला मी जबाबदार आहे, मी कंपनीचं स्वरूप खूप वेगाने वाढवलं होतं. मी त्याबद्दल माफी मागतो. असे जॅक डोर्सी यांनी ट्विट केले आहे

हे ही वाचा :

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार

Andheri By Poll Result 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; हा माझ्या पतीचा विजय

IND vs ZIM : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss