spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता; आशिष शेलार

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचं दिवस होता. ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडली. त्यानंतर आज ६ नोव्हेंबरला अंधेरीत मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. त्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर ट्विट करून महाविकास आघाडीवर टोला लगावला. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकालानंतर (Andheri Bypoll Result) भाजपने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचे अभिनंदन केले आहे. ऋतुजा लटके यांचा विजय भाजपमुळे झाला असून आम्ही निवडणूक लढवली असती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पराभव निश्चित असता असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले.

 शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा ५३ हजार ४७१ मताधिक्याने विजय झाला. ही पोटनिवडणुकी दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये विजय झाला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप व इतर डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊनही ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाला अधिक मतदान झालेच नसल्याचे सांगत भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता असे शेलार यांनी म्हटले.

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर या निवडणुकीत नोटांचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्य्यावर बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या, “नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी(भाजपाने) जरी उमेदवारी मागे घतेली होती, तरी लोकांना सांगण्यात आलं आणि आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत की तुम्ही नोटाला मतदान करा. नोटाचा असा प्रचार होत नसतो नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचं बटण दाबू शकता. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटावर का मतदान केलं?”

हे ही वाचा :

नोटाला मिळालेली मतं म्हणजे भाजपा आणि ‘मिंधे’ गटाच्या विकृतीचं दर्शन; अरविंद सावंत

एलॉन मस्क यांनी केलेल्या कारवाईनंतर ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी मागितली माफी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss