spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

भारताने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव करत ग्रुप २ च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगलादेशला हरवून ६ गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र भारताने झिम्बाब्वाचा पराभव करत आपली गादी पुन्हा मिळवली. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव ११५ धावात गुंडाळला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकात झिम्बाब्वेला दोन धक्के दिले. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर विजली मॅधवरेला शुन्यावर बाद केले. तर अर्शदीप सिंगने देखील रेगिस चकाब्ववाला शुन्यावर बाद करत झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला.

टी २० विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचला असून सर्वाधिक गुण घेत भारतानं सेमीफायनल गाठली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने ७१ धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. ज्यात भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकांच्या जोरावर १८६ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या ११५ धावांत झिम्बाब्वेला सर्वबाद करत भारतानं ७१ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताचे गुणतालिकेत ८ गुण झाले असून दोन्ही ग्रुपमधील संघामध्ये भारताचेच गुण सर्वाधिक आहेत. भारतानं केवळ एक साखळी सामना (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) गमावला असून इतर सर्व सामने जिंकले आहेत.

सेमीफायनलमधील चार टीम्स निश्चित झाल्या आहेत. ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स टी २० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. ग्रुप १ मधील टॉप टीम ग्रुप २ मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप २ मधील टॉप टीम ग्रुप १ मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे. म्हणजे टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तान न्यूझीलंडला भिडणार आहे.

हे ही वाचा :

अंधेरी पोटनिवणुकीनंतर उद्धव ठकरे यांची पहिली प्रतिक्रिया; ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss