spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली – नाना पटोले

काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. आज अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. लटके यांचा हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाने अंधेरी पूर्व मध्ये पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास ती जागा बिनविरोध व्हावी अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या परंपरेला तिलांजली देत उमेदवारी अर्ज दाखल केला पण या मतदारसंघात आपला निभाव लागणार नाही याची त्यांना जाणीव होताच परंपरेचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेतला. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाने अशी परंपरा कधीही पाळलेली नाही. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या मतदारसंघात मागील दोन तीन वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने उमेदवार दिले होते, त्यामुळे त्यांचा परंपरा राखल्याचा दावा खोटा आहे.

पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत लटके या आघाडीवर होत्या. ऋतुजा लटके ५३४७१ मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे. त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिली आहे. आजवर कोणत्याही पोटनिवडणुकीची झाली नव्हती तेवढी चर्चा अंधेरी पूर्व विधानसभेची झाली. सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या या पोटनिवडणुकीची आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. सर्वच फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर होत्या. त्यांना ६६ हजार २४७ मतं मिळाली आहेत.

हे ही वाचा :

‘…तर गाठ माझ्याशी’, भर पत्रकार परिषदेत संभाजीराजे भडकले, नेमकं काय घडलं?

भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss