spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आलिया आणि रणबीरला झाली मुलगी; तर करण जोहर होतोय ट्रोल ?

रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतरच त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते . त्यात लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलियानं आपण प्रेग्नंट असल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता. आलिया आता एका मुलीची आई झाली आहे. सोशल मीडियावर सगळीकडे आलिआ आणि रणबीरच कौतुक केला जात आहे. बॉलीवूडमधून तर रणबीर आणि आलियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच चाहत्यांकडूनही दोघांचं भरपूर कौतुक केलं जात आहे . आलिया आणि रणबीरच्या मुलीला भेटण्यासाठी करण जोहर रुग्णालयात गेला होता तेव्हापासूनच कारण जोहरला सोशल मिडियावर ट्रॉल केला जात आहे .

सकाळपासून सर्व बॉलीवूडचे लक्ष आलियाकडे लागले होते. त्यामुळे तिची गोड बातमी व्हायरल झाल्यापासून त्या दोन्ही सेलिब्रेटींवर कौतूकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे. आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये आलिया आणि रणबीरच्या कामाचे कौतुकही करण्यात आले .

मिळालेलय माहितीनुसार आलिया आणि रणबीरला मुलगी झाली हे कळताच बॉलीवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हा आलिया आणि रणबीरला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला . हे नेटकर्यांना कळताच नेटकाऱ्यानी सोशल मीडियावर करणला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे . त्याचा फोटो दाखवून पाळण्यातील आलियाच्या बाळाचा फोटो दाखवत तू मोठेपणी अभिनेत्री होणार असे वाक्य करण जोहरच्या तोंडी घालण्यात आले आहे, सोशल मीडियावर करण जोहरचे वेगवेगळे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

तर काही लोकांचा आनंद साजरा करतानाच व्हिडिओ शेअर करत त्यातील नाचणाऱ्या व्यक्तीला करण जोहर असे संबोधण्यात आले आहे . एका ट्रोलमध्ये तर कोई मिल गया या चित्रपटातील जादू आणि ह्रितिक रोशन यांची भेट होतानाच एक फोटो दाखवून त्यात करण जोहर कि तू माझ्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करशील ? अस आलिया आणि रणबीरच्या मुलीला विचारतो .

हे ही वाचा :

भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता; आशिष शेलार

नोटाला मिळालेली मतं म्हणजे भाजपा आणि ‘मिंधे’ गटाच्या विकृतीचं दर्शन; अरविंद सावंत

भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता; आशिष शेलार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss