spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदेंचा ठाकरेंना दणका: पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे बंधूंशी पंगा

महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना या राजकारणाला एक वेगळं वळण येणार अस दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारो सुरूच आहेत . दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कार्यक्रमांमध्ये दिसत असल्याने राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे अशी चर्चा होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश देऊन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेच नाही तर राज ठाकरे यांना देखील दणका दिला आहे .

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केलाय. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील असून , हे सर्व कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देत असताना कार्यकर्त्यांना सम्बोधित करत मुख्यमंत्र्यांनी माविआ सरकारवर टीका केली आहे . मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि “विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. त्यांना पोटशूळ उठलेलं आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढं काम करतंय, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहीलं तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत विरोधकांच्या मनात निर्माण झालीय”, असा खोचक दावा शिंदेंनी केला.

शिंदेनी पुढे सांगितलं कि पुढे “आपण एका विश्वासाने आलेला आहात. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. हे सरकार तुमचं, आमचं सगळ्याचं आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे. या सरकारमध्ये १७० आमदारांचं मजबूत बहुमत आहे”, त्याचबरोबर “या सरकारकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. एक मजबूत सरकार या राज्यामध्ये काम करतंय. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेतोय. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाहीय”, असा टोला त्यांनी लगावला.

हे ही वाचा :

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये निया शर्माचा बोल्ड आणि ग्ल्यामर्स लूक; पहा फोटो

भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली – नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss