spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही; नीलम गोरेंच विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे काही अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असूनही सहभागी झाले. पण त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांची अनुपस्थिती बघायला मिळाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ‘अजित दादांची गॅरंटी नाही’ असं स्पष्ट विधान केलंय.

नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, याआधी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. तेव्हा ते राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने बोलावून निधी द्यायचे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलंय. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आली. शिवाय अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही, असं विधान नीलम गोऱ्हेंनी केलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आमदारांचा निधी कपात केल्याबद्दल नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आमदार म्हणून मला अजिबातच निधी दिला नव्हता. शेवटी, काल-परवा आम्ही खूप पाठपुरावा केल्यानंतर थोडाफार निधी देतो, असं सांगितलं. ही कामं तीन वर्षांपूर्वी मान्य झाली होती, त्यालाही निधी दिला नाही. पण मला वाटतं की, आज ना उद्या त्यांना (भाजपा) विरोधी पक्षातील आमदारांची दखल घ्यावी लागेल. त्यांनाही निधीचं वाटप करावं लागेल. कारण संबंधित मतदारसंघात भाजपाचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य असतात. त्यांचाही विचार करणं भाजपाला क्रमप्राप्त आहे.”

हे ही वाचा :

रणबीर-आलियासाठी अभिनेता कमाल आर खानने दिलेल्या शुभेच्छा पाहून चाहत्यांचा राग अनावर

शिंदेंचा ठाकरेंना दणका: पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे बंधूंशी पंगा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss