spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुजरातमध्ये पूर्वीचे सर्व विक्रम मोडायचे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

भाजपशासित गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार असून मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील; आदिवासी पट्ट्यातून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना सांगितले गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा राज्यात भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी मागील सर्व विक्रम मोडण्याचा निर्णय घेतला आहे – पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, केवळ गुजरातमध्येच नाही. देशात व जगात असे क्वचितच घडले असेल जिथे एखादा राजकीय पक्ष इतका काळ जनतेची सेवा करत असेल. यावर पुढे पंतप्रधानांनी सांगितले की “आदिवासींसाठी पंतप्रधान मोदींची एबीसीडी A ने सुरू होते. आदिवासी बांधवांचे आशीर्वाद घेऊन पंतप्रधान मोदिंनी गुजरातमध्ये त्यांचा निवडणूक प्रचार सुरू केला आहे. गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी मागील सर्व विक्रम मोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदींनी एका सभेला संबोधित करताना सांगितले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले कि “गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्या, काही दिवस सर्व एकत्र ठप्प झाले, लोकांना त्यांचे व्यवसाय दिवसभर बंद ठेवावे लागले. गुजरातच्या जनतेने एकत्र येऊन हे राज्य आज जिथे आहे तिथे नेले. गुजरात आज वेगाने विकसित होत आहे आणि सर्वांसाठी भरपूर संधी आहेत. पंतप्रधानांनी जमावाला सांगितले. द्वेष पसरवणाऱ्या आणि गुजरातला बदनाम करणाऱ्या राजकीय शक्तींचा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातून सफाया केला जाईल, आणि काँग्रेसच्या फुटीरतावादी राजकारणामुळे गरीब आणि मागासलेल्या जनतेच्या मूलभूत गरजा कधीच पूर्ण झाल्या नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन दशकांपूर्वी गुजरात गरीब होता आणि तरुणांना संधी मिळत नव्हती, परंतु या दोन दशकांमध्ये हे पूर्णपणे बदलले आहे.

तर गुजरात काँग्रेसने आज सांगितले की त्यांनी गेल्या अडीच दशकांतील भाजप सरकारच्या अपयशांबाबत २० मुद्दे सूचीबद्ध केले आहेत आणि ते त्यांच्या प्रचारादरम्यान लोकांसमोर आणतील. “शिक्षणाचे व्यापारीकरण, महागाई, वाढती बेरोजगारी आणि राज्यातील वाढती कर्जबाजारीपणा यातून भाजपने गेल्या २७ वर्षांपासून कसा चुकीचा कारभार चालवला आहे हे अधोरेखित करण्याचा गुजरात काँग्रेसचा प्रयत्न आहे ,” असे काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा :

उद्या पासून महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेला सुरवात

जान्हवी कपूरने ओरहान अवत्रामणीबद्दल केला मोठा खुलासा

आलिया आणि रणबीरला झाली मुलगी; तर करण जोहर होतोय ट्रोल ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss