spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी साडे दहा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी एका वृत्तसंस्थेली दिली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना ३० मार्च रोजी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचं निदान झालं होतं. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले.

तसेच मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आज ८ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

दरम्यान, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु असताना देखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली होती. शरद पवार शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी इथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केलं. तर, शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांच्या निनादात पवार यांचं स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आलं होतं. तर चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं.

हे ही वाचा :

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातील कॉमन मॅन झाला आउट; त्रिशूल मराठेने घेतला घराचा निरोप

छगन भुजबळांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; नाशिक येथील सिडकोचे कार्यालय…

संभाजी राजेंच्या भूमिकेचं जितेंद्र आव्हाडांनी केलं स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss