spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bharat Jodo Yatra : आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदार-खासदार भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करेल. यावेळी पदयात्रेकरूंच्या हातात मशाली पाहायला मिळणार अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. आमदार आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून पण देण्यात आली आहे.

EWS Reservation : आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा, १० टक्के आरक्षण वैधच

ठाकरे कुटुंबीय भारत जोडो यामध्ये सहभागी होणार की नाही याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर आदित्य ठाकरे या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत.

हेही वाचा : 

JEE Mains 2023 Exam : JEE मेन २०२३ परीक्षेच्या तारखा NTA लवकरच करणार जाहीर

राज्यामध्ये सध्या भाजप, शिंदे गट, मनसे यांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत असणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच इतर आमदार किंवा खासदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली. सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे अद्याप यात्रेत सहभागाबाबत ठरलं नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत जोडोच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम सुरु असून अनेक पक्षाचे नेते यामध्ये सहभागी होत आहे.

सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे व श्रीकांत शिंदे आमनेसामने

श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार असून, गेल्या तीन दिवसांपासून याची तयारी करण्यात येत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी सुरवातीला सिल्लोडच्या महावीर चौकात परवानगी मागितली होती, पण पोलिसांनी ती परवानगी नाकारली होती त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या स्टेजसाठी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात परवानगी देण्यात आली आहे. आज होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये सायंकाळी ४ वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं होणार असून, कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Latest Posts

Don't Miss