spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

WhatsApp Update : व्हाट्सअँपने यूजर्सला दिली ‘हि ‘ खास भेट; घ्या जाणून

WhatsApp हे जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अँप्सपैकी एक आहे. सध्या व्हाट्सअँप हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. आणि याच व्हाट्सअँप मध्ये एक नवीन अपडेट आले आहे.

WhatsApp हे जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अँप्सपैकी एक आहे. सध्या व्हाट्सअँप हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. आणि याच व्हाट्सअँप मध्ये एक नवीन अपडेट आले आहे. अलीकडेच, WhatsApp पोल आणि कम्युनिटी फीचरची घोषणा केली असून, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काही अप्रतिम फीचर्स जोडली आहेत. यासोबतच व्हिडीओ कॉलिंग (Video Calling) आणि ग्रुपमध्ये सदस्य जोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेटच्या नवीन फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

व्हॉट्सअँपच्या रिमेंबर प्लेबॅक आणि फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्ड मेसेज फीचर्समध्ये, तुम्ही ऐकताना व्हॉइस मेसेजला विराम देऊ शकता आणि नंतर त्याच ठिकाणाहून पुन्हा ऐकणे सुरू करू शकता. पुन्हा रेकॉर्डिंगसाठी तयार झाल्यावर, तेथून पुढे संदेश रेकॉर्ड केला जाऊ शकतो. फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्डेड मेसेज फीचरमध्ये युजर्सना १.५ आणि २ पट वेगाने व्हॉइस मेसेज प्ले करण्याची सुविधा मिळेल. रेग्युलर सोबत फॉरवर्ड मेसेज देखील जलद ऐकू येतात.

कंपनीने या फीचरसाठी यूजर्सना उच्च-स्तरीय सुरक्षा आणि गोपनीयता देण्याचा दावा केला आहे. या वैशिष्ट्यासह, तुम्ही अनेक गट एकत्र जोडू शकता. ज्याची संपूर्ण जबाबदारी समुदाय तयार करणाऱ्या व्यक्तीची (प्रशासक) असेल. प्रशासक त्यांच्या पसंतीच्या समुदायामध्ये गट जोडण्यास सक्षम असतील. तसेच, सर्व सदस्यांसाठी आक्षेपार्ह चॅट्स आणि मीडिया हटवण्याचा अधिकार अँडमिनला असेल.

या वर्षी मे महिन्यात व्हाट्सअँप ने ग्रुप अ‍ॅडमिनला ५१२ सदस्य जोडण्याची परवानगी देण्यासाठी त्याचे प्लॅटफॉर्म अपडेट केले. आता पुन्हा कंपनीने ग्रुपमध्ये जोडणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट करून १०२४ केली आहे. तुम्ही तुमच्या फोनमध्ये WhatsApp अपडेट करताच हे फीचर उपलब्ध होईल.

मेसेजिंग आणि कॉलिंगची सुविधा देणारे व्हाट्सअँप लवकरच आपल्या युजर्सना व्हिडिओ कॉलसाठी मोठी सुविधा देणार आहे. व्हाट्सअँपचे ३२ यूजर्स एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतील. सध्या ८ लोक व्हाट्सअँप च्या व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकतात. यूजर्स कॉल ऑप्शनवर जाऊन ‘कॉल लिंक’ तयार करू शकतील. कुटुंब आणि मित्रांसह शेअर करू शकतील. व्हाट्सअँप वापरकर्त्यांना कॉल लिंक वापरण्यासाठी अँप ‘अपडेट’ करावे लागेल.

व्हाट्सअँपवर ग्रुप मोठा आणि चांगला बनवण्यासोबतच कंपनीने आणखी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे यूजर्स ग्रुप चॅटमध्ये पोल तयार करू शकतात. या फीचरमध्ये यूजर्स एका प्रश्नाच्या उत्तरात १२ पर्याय देऊ शकतात. तसेच निकाल पाहण्यासाठी ‘व्ह्यू व्होट्स’चा पर्याय देण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Bharat Jodo Yatra : आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदार-खासदार भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

‘एकदम कडक’ चित्रपटातील मानसी नाईकच्या एंट्रीने सर्वत्र झालंय वातावरण कडक

JEE Mains 2023 Exam : JEE मेन २०२३ परीक्षेच्या तारखा NTA लवकरच करणार जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss