spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छगन भुजबळ यांची प्रकृती ढासळली; रुग्णालयात केलं दाखल

राष्ष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ (Senior Nationalist leader and former Minister of State Chhagan Bhujbal) यांची प्रकृती ढासळली असून त्यांना बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) दाखल करण्यात आलं आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात होते. आजच त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज छगन भुजबळ रुग्णलयात दाखल झाले आहेत. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल झाले आहेत. छगन भुजबळ यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात ते दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घऱगुती उपचार केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शरद पवार यांना ३१ ऑक्टोबरला प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार होता. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. “दिवाळीत किमान ५० हजार लोकांना शरद भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं असून न्युमोनिआ किरकोळ विषय आहे,” असा विश्वास माजी आरोग्यामंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांना भेटल्यावर व्यक्त केला होता.

हे ही वाचा :

IND vs ENG : टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारतविरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार, टीम इंडिया पुढे असतील ही आव्हाने

मुख्यमंत्री, उद्योग आणि कृषी मंत्र्यांचं नाव काय गद्दार; आदित्य ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss