spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी; ‘स्वारी म्हणतो, शब्द मागे घेतो’

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. त्यांच्या या वादाग्रस्त विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना २४ तासांचा अल्टीमेट दिला आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यातून टीकेची झोड पाहता सत्तार यांनी माघार घेतल्याचेही स्पष्ट केलं.

“मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, स्वारी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भिका*** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे वाढता विरोधपाहून अखेर सत्तारांनी आपले शब्द मागे घेतो असे म्हटले आहे.

“मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही, असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले. परंतु, माफी मागत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्याचं टाळलं आहे.

हे ही वाचा :

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर खालच्या भाषेत टीका; राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

ट्विटर युजर्ससाठी आनंदाची बातमी; एलॉन मस्क यांची नवीन योजना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss