spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ट्विटरने कॉपीराइट उल्लंघनाबद्दल काँग्रेस, भारत जोडो यात्रेचे हँडल ब्लॉक करण्यास सांगितले

बेंगळुरू न्यायालयाने सोमवारी ‘KGF Chapter-२’ चित्रपटाच्या साउंड रेकॉर्डचा बेकायदेशीरपणे वापर करून MRT म्युझिकच्या मालकीच्या वैधानिक कॉपीराइटचे उल्लंघन केल्याबद्दल ट्विटरला काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची खाती तात्पुरती ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. एमआरटी म्युझिकने शुक्रवारी ही तक्रार नोंदवली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाटे यांच्या विरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात कॉपीराइट कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला.

कथीत कॉपीराइट उल्‍लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे निर्देश बंगळुरूतील कोर्टानं दिले आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये KGF Chapter २ चित्रपटातील म्युझिकचा वापर करण्यात आल्यानं कॉपीराईटच्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टानं हे आदेश दिले आहेत. बेंगळुरूमधील एका कमर्शिअल कोर्टानं सोमवारी ट्विटरला एमआरटी म्युझिकनं दाखल केलेल्या कॉपीराइट उल्लंघनाच्या दाव्यानुसार काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चं ट्विटर हँडल तात्पुरतं ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. के जी एफ चॅप्टर २ अर्थात MRT म्युझिक विरुद्ध इंडियन नॅशनल काँग्रेस असा हा खटला आहे.

कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं की, “प्राथमिकदृष्ट्या हे स्पष्ट होतं की अशा प्रकारे जर संगिताचा बेकायदा वापर केला गेला तर त्यामुळं अशा वापरास प्रोत्साहन मिळेल त्यामुळं फिर्यादीचं कधीही भरून न येणारं नुकसान होईल. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर उचलेगिरीला प्रोत्साहन मिळू शकतं”.

हे ही वाचा :

सत्तारांच्या भाषणावेळीच कार्यकर्ते निघाले; चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपाई विधानानंतर एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss