spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अशा विधानांमुळे ‘देवेंद्र फडणवीस’ यांचं नाव खराब होत ; ठाकरेंनी उपमुखमंत्र्यांना केलं लक्ष

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यात वाद पेटला. विरोधकांकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. पुढे त्यांनी देवेंद्र फडणविसांनी फडणवीस यांनाही लक्ष केले आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव अशा विधानांमुळे खराब होत आहे. मी जर उपमुख्यमंत्री असतो तर बाहेत पडलो असतो, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष केलं आहे.

अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे बुलढाण्यातील सभेत म्हणाले, “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”

हेही वाचा : 

हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून ठाण्यातील विवियाना मॉल राडा, जितेंद्र आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

“महाराष्ट्रातील जनता म्हणून मी तुम्हालाही विचारत आहे की, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असे सवालही आदित्य ठाकरेंनी विचारले आहेत.

‘एका गद्दाराच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे चालला. मी सरकारमध्ये असतो तर बाहेर पडलो असतो. देवेंद्र फडणवीस सराकरमध्ये का आहेत ते कळत नाही. जे वातावरण तयार केलं जात आहे, ते ठाकरे परिवाराला संपवण्यासाठी केलं जात आहे,’ असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

सरकार कोसळणार

‘तुम्ही गद्दार आहात, हे सरकार २-३ महिन्यांमध्ये कोसळणार आहे. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. हे गद्दार काय करत होते, यावर आम्ही नजर ठेवली नाही. कोणत्याही बाईला शिवी द्या, तसे संस्कार तुमच्या घरात असतील. या महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, असा असेल राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम

श्रीकांत शिंदेची टिपणी

आदित्य ठाकरे यांनी भाषणात एखादा डायलॉग मारला की या लोकांना टाळ्या वाजवायला लावायचो. हे सगळं आम्ही त्यांच्यासाठी केले आहे. पण आज आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासाठी काम करणारी लोकं उरली नाहीत, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

Latest Posts

Don't Miss