spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाणे व नवी मुंबई नंतर कल्याण-डोंबिवलीचे माजी नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी

राज्यात सत्तांतर घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्ह्यातून प्रथम 66 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

मुंबई : राज्यात सत्तांतर घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्ह्यातून प्रथम 66 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर नवी मुंबईतील 28 माजी नगरसेवक यांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे. पाठोपाठ आता कल्याण डोंबिवलीतील 40 शिवसेना माझी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेनेत अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत तेथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या संपूर्ण गोष्टीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, ” ही संपूर्ण चुकीची माहिती आहे मुंबई ठाणे नवी मुंबई येथे आता कोणतेही नगरसेवक नाही. इथे प्रशासकीय राजवट लागू आहे. तर सेवा गेले तर कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. त्या लोकांना परत निवडून यावे लागेल त्यानंतर ते नगरसेवक होतील या तिन्ही भागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील त्यामुळे चुकीची माहिती देऊन अफवा पसरू नका. कार बदललेले असेल तरी अजून अफवा मान्यता मिळालेली नाही” असे राऊत म्हणाले.

हेही वाचा :

“महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचे कारस्थान”, संजय राऊतांची प्रतिक्रिया

त्याचबरोबर आज दुपारी २ वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकर परिषद असल्याची माहिती राऊत यांनी दिली. या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टीवर उद्धव ठाकरे भाष्य करतील असे सांगण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss