spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

RRR हा जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा ‘भारतीय चित्रपट’ बनला

राजमौली यांचा RRR हा चित्रपट जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपटाचा विक्रम केला आहे . या आधी आमिर खानचा ३ इडियट्स या चित्रपटाने जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपटाचा विक्रम केला होता . पण राजमौली यांच्या RRR या चित्रपटाने हा विक्रम मोडून काढला आहे. जपानमधील ४४ शहरे आणि प्रांतांमध्ये २०९ स्क्रीन आणि ३१ आयमॅक्स स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १७ दिवसांत १८० दशलक्ष येन(जपानी चलन) कमावले आहेत.जपानमधील ‘३ इडियट्सची’ आजीवन कमाई १७० दशलक्ष जपानी येन इतकी आहे. RRR,१८० दशलक्ष जपानी येन सह, ३ इडियट्सला मागे टाकून जपानमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या भारतीय चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवली आहे .

२४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला रजनीकांतचा मुथू हा जपानमधील बॉक्स ऑफिसवर ४०० दशलक्ष जपानी येन कलेक्शनसह आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. राजामौलीचा बाहुबली २ ने ३०० दशलक्ष जपानी येन बॉक्स ऑफिस कलेक्शनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आता राजामौली यांच्या निर्मात्याच्या आरआरआरने आता तिसरे स्थान पटकावले आहे.तीन आठवड्यांपूर्वी, एसएस राजामौली राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसह त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जपानमध्ये होते. RRR ही १९२० च्या पूर्व-स्वतंत्र युगात रचलेली एक काल्पनिक कथा आहे आणि ती दोन वास्तविक नायक आणि सुप्रसिद्ध क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित आहे – अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम. राम चरणाने रामाची भूमिका केली, तर तारक हे भीमच्या भूमिकेत दिसले.

ऑक्टोबरमध्ये, राजमौली यांचा RRR हा चित्रपट अमेरिकेतील ‘The Creative Life’ या चायनीज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एका अहवालात सांगण्यात आलं की थिएटरमधील ९३२ तिकिटे २० मिनिटांत विकले गेले . सिंगल शोमधूनच , चित्रपटाने २१,०००० डॉलर कमावले असून , रिलीजपासून त्याची एकत्रित बॉक्स-ऑफिस कमाई २,२१,१५६ डॉलर इतकी झाली आहे .

हे ही वाचा :

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्टीनी घेतली राज्यपालांची भेट, सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणी

Eknath Shinde : एका ट्वीटमूळे CM एकनाथ शिंदेंना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा प्रतिक्रिया

हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून ठाण्यातील विवियाना मॉल राडा, जितेंद्र आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss