spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे खूप गरजेचे आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फळे , हिरव्या पालेभाज्या , पोषक तत्वांनी असलेले पदार्थ खाणे , यामुळे देखील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास आपल्याला अशक्तपणा जाणवतो. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत तर ते जाणून घ्या.

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर , आपल्याला कोणताही आजार होत नाही. तसेच गंभीर आजरांपासून वाचवण्याचे काम रोगप्रतिकार शक्ती करते. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यास सर्दी , खोकला , या सारख्या लक्षणांवर मात करणे कठीण होऊन जाते. त्यासाठी आपल्या आरोग्याला व्यायाम , योगासने, आणि पोषक तत्वे असलेला आहार खूप गरजेचा आहे. चला तर मग जाणून घेऊया उपाय.

 

रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यास मदत होते. कारण अनेकदा खाण्या पिण्यात हलगर्जी पणा केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शरीराला निरोगी आहार महत्वाचा आहे. आपल्याला गरज असलेली पोषक तत्वे प्रथिनेयुक्त आणि कमी कार्बयुक्त अन्नातून मिळते. तसेच आपल्याला भाज्या, फळे, धान्य हे शरीरासाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन सी देखील गरजेचे आहे.

ओटस मध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असते. ओटस मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे नियमित पणे ओटसचे सेवन करणे.

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. यामुळे वेगवेगळया रोगांशी लढण्यासाठी मदत करते. त्याच बरोबर व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी देखील खूप उत्तम आहे.

तसेच तुम्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचे देखील सेवन करू शकता. आवळ्याचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आवळा पाणी प्यायल्याने वजनही नियंत्रित राहते. आणि डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते.

हे ही वाचा :

गाजर पासून बनवा चविष्ठ गाजर हलवा…

 

Latest Posts

Don't Miss