spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पक्षाच्या चिन्हाबाबत संजय राऊत यांची भूमिका

पक्ष बांधणीसाठी सध्या संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.

सध्या सेना आणि शिंदे गटात शीत युद्ध सुरु आहे. दोन्हींकडून अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पक्ष नेमका कुणाचा या बद्दल मागच्या काही दिवसात चर्चा रंगलेली असतानाच आता पक्षाच्या चिन्हावरून ही दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत मांडले आहे. पक्ष बांधणीसाठी सध्या संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. तर एकीकडे शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Sanjay Raut statement on Shivsena party sign
आम्ही हिंदुत्वासाठी पक्षातून वेगळे झालेलो आहोत असे म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. केलेल्या बंडाची रोज उठून वेगवेगळी कारणं देणं आधी बंद करावे. शिवसेनेवर, धनुष्यबाणावर हक्क सांगणाऱ्यानी सर्व स्वतः सर्व निर्माण करावं. धनुष्यबाण हे शिवसेनेचचं राहणार यात शंका नाही. अशी भूमिका संजय राऊत यांनी पत्रकारांसमोर मांडली.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे नवीन पक्ष चिन्हं स्वीकारण्यासाठी तयार रहावे असे आवाहन केले आहे. कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास पक्षाचे नवीन चिन्हं कमीत कमी वेळात सर्वदूर पोहचवण्याच्या तयारीत रहा असं सांगितल्याची माहिती समोर येतेय. माझी प्रकृती आता ठीक आहे. काही समस्या असल्यास दोन दिवसाआड मी तुम्हाला सेनाभवनात उपलब्ध होईन. असं ही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचा समजतंय.

Latest Posts

Don't Miss