spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यं भूकंपाने हादरली, नेपाळमध्ये मृत्यू

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्हे भूकंपाने हादरले.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्हे भूकंपाने हादरले. रात्री ८.५२ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल इतकी होती तर मध्यरात्री १.५७ वाजता पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता ६.३ इतकी होती. रात्री उशिरा झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला.

उत्तर प्रदेशातील अनेक भागात मंगळवारी रात्री सुमारे ५ तासांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन दुसऱ्यांदा जवळपास २० सेकंद थरथरत होती. तर, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमधील डोटीमध्ये घर कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून शोक व्यक्त केला आहे. नेपाळमध्ये ६.६ रिश्टर स्केलच्या भूकंपात किमान सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. नेपाळमध्ये भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी उशिरापूर्वी पश्चिम नेपाळमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले. मंगळवारी रात्री ९.०७ वाजता ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्यानंतर लगेच ९.५६ वाजता ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

 उत्तर प्रदेशातील अनेक भागात मंगळवारी रात्री सुमारे पाच तासांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, जमीन दुसऱ्यांदा जवळपास २० सेकंद थरथरत होती. मात्र, या भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंप झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांच्या घरातील सामान अचानकपणे हलू लागल्यामुळे लोकं मध्यरात्री घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचे अनुभव लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

बुधवारी पहाटे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, ६.३ तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. राजधानीतील अनेक भागात दुपारी १.५७ च्या सुमारास या भूकंपाच्या धक्क्यांनी लोक अचानक जागे झाले. दिल्लीशिवाय उत्तराखंड, हिमाचल आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत

 १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८. ४३ वाजता मध्य प्रदेशातील जबलपूर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. आयएमडीचे शास्त्रज्ञ वेद प्रकाश यांनी सांगितले की, त्याचा केंद्रबिंदू दिंडोरीजवळ १० किमी खोलीवर होता.

हे ही वाचा :

Justice DY Chandrachud : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश, ४४ वर्षानंतर वडिलांची जबाबदारी पुत्रावर

Dipali Sayyad : दीपाली सय्यद आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर; भेटीआधीच शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss