spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shiv Sena leader and MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आज निर्णय देण्यात आला आहे.

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shiv Sena leader and MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आज निर्णय देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे.

विशेष पीएमएल न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक खरं बोलणारा शिवसैनिक या निर्णयाचे स्वागत करतोय अशी प्रतिक्रिया युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. संजय राऊत हे खरे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. जामिनासंदर्भातील याचिकेवरील आदेश ९ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टीपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला होता आणि लेखी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार विशेष सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे ईडीच्या वतीने ऍड. आशीष चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केले, तर संजय राऊत यांच्या वतीने ऍड. विक्रांत साबणे यांनी बाजू मांडली.


काय आहे प्रकरण ?

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून यामध्ये राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला बेकायदा आर्थिक लाभ मिळाले आहेत, असा आरोप ईडीने ठेवला आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राऊत असून त्यांनी यामधून मिळालेल्या आर्थिक लाभातून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. राऊत यांनी सर्व आरोपांचे खंडन केले असून, केवळ राजकीय हेतूने मला अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे. राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्यामार्फत राऊत यांनी परदेशी सहल आणि मालमत्ता खरेदी केली, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणात आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आले आहेत.

राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आपलं लेखी उत्तर न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयानं जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल देणार आहे. मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात येणार आहे.

राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. आर्थिक घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ३० जून २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हा त्यांना ईडी कोठडी ठेवण्यात आले होते. तर, ८ ऑगस्ट रोजी पीएमएलए कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे खासदार राऊत यांना आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. तर, ७ सप्टेंबरला त्यांनी पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

हे ही वाचा :

Har Har Mahadev चे शो बंद पाडल्यास खळ्ळखट्याकचा इशारा; मनसे आक्रमक

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामिनावर आज निर्णय, ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss