spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut Bail: कोर्टाने EDला झापलं; ईडीने मर्जीने आरोपी निवडले

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे पीएमएलए विशेष कोर्टाने (PMLA Special Court) ईडीवर (ED) ओढले आहेत.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे पीएमएलए विशेष कोर्टाने (PMLA Special Court) ईडीवर (ED) ओढले आहेत. ईडीने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही अटक नसून ईडीने स्वत: च आरोपी निवडले असल्याचे विशेष कोर्टाने म्हटले आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए विशेष कोर्टाने आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामिनासाठी १२२२ पानी आदेश काढले. या आदेशात कोर्टाने आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन देताना ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, दोन्ही आरोपींना बेकायदेशीरपणे अटक केली आहे असे कोर्टाला वाटत आहे. मुख्य आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि या घोटाळ्यातील सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला.

पीएमएलए कोर्टाने आपल्या १२२ पानी आदेशात ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने अतिशय महत्त्वाची निरीक्षण नोंदवले आहे. कोर्टाने म्हटले की, दिवाणी खटले हे मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून आणि अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली असल्याची महत्त्वाची टिप्पणी विशेष कोर्टाने केली.

या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक करण्याऐवजी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. यात ईडीने आरोपी स्वत: च निवडले असल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने म्हणत ईडीच्या तपासावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने इ़डी आणि म्हाडाचं म्हणणं मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल. त्याच्या परिणामी सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल असेही कोर्टाने म्हटले. पीएमएलए विशेष कोर्टाने ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढल्याने पत्राचाळ घोटाळ्यातील तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता.

हे ही वाचा :

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut Bail : संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले ; आदित्य ठाकरे

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामिनावर आज निर्णय, ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss