spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अरबाज खान आणि मलायका अरोरा पुन्हा एकमेकांच्या आवडीनिवडींचे कौतुक करू लागले

अभिनेता अरबाज खानने त्याच्या माजी पत्नी मलायका अरोरा बद्दल सध्याचे समीकरण उघडले आहे आणि टिप्पणी केली आहे की घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतरही दोघेही एकमेकांना स्वीकारू लागले आहेत. त्यांनी हे देखील उघड केले की ते दोघेही एकमेकांच्या आवडी निवडींचे कौतुक करू लागले आहेत आणि त्यांचा मुलगा अरहान खानवर त्यांचे समान लक्ष केंद्रित करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत .

अभिनेता अरबाज खानला एका मुलाखतीत , “मलायकाचे अरबाजसोबत घटस्फोटानंतरचे नाते अधिक चांगले झाले आहे ,या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का,” असे विचारले असता, त्यावर अरबाजन क्षणभर थांबले आणि बोलले की त्यांना एक मूल आहे. त्यामुळे मुलाची मानसिक स्थिती चांगली असावी असे अर्ब्जला वाटत. अरबाज म्हणाला, “अरबाज आणि मलायका दोघेही वेगवेगळे झाले आहेत, आणि गेल्या काही वर्षांत दोघेही घटस्फोटानंतरचे नाते समजायला परिपक्व झाले आहेत, आणि एकमेकांच्या आवडी निवडीचा गोष्टींचा दोघेही स्वीकार करत आहोत.” अरबाजने पुढे सांगितले की , “त्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे . जीवनातील गोष्टी स्वीकारायच्या आहेत, आणि अरबाजबद्दल अनेक गोष्टी आहेत ज्या मलायकाने स्वीकारल्या असतील आणि मलायकाबद्दल खूप गोष्टीअरबाजकडे असतील हे सर्व काही त्या दोघांनीही स्वीकारले आहे . पण दोघांची एक समान आवड आहे, आणि ते म्हणजे त्यांचा मूलग अरहान खान आणि तो मोठा होत असताना मतभेद असतील अशा कोणतीही परिस्थिती ते तयार होऊ देणार नाही .”

अरबाज आणि मलायका १९९८मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. ते २० वर्षांच्या अरहान खान नावाच्या मुलाचे पालक आहेत. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, या जोडप्याने त्यांचे वेगळे होण्याची घोषणा केली आणि २०१७ च्या सुरुवातीला घटस्फोट घेतला.सध्या अरबाज खान अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे तर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कामाच्या आघाडीवर, अरबाज तनाव या थ्रिलर मालिकेत काम करत आहे, जे फौदा या इस्रायली शोचे रूपांतर आहे. मलायका शेवटची लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये जज म्हणून दिसली होती.

हे ही वाचा :

Sanjay Raut : राऊतांच्या जामीनावर नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया; पहा कोण काय म्हणाले ? पिंजऱ्यातून वाघ बाहेर येतोय…

T20 World Cup : पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, न्यूझीलंडवर ७ गडी राखून मात

Sanjay Raut Bail: कोर्टाने EDला झापलं; ईडीने मर्जीने आरोपी निवडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss