spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut : राऊतांच्या जामिनाची बातमी कळताच उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले संजय…

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांना पत्राचाळ (Patra Chawl Case) गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी जामीन मिळाला आहे. पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर आता संजय राऊत यांचा जेलबाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांना पत्राचाळ (Patra Chawl Case) गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी जामीन मिळाला आहे. पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर आता संजय राऊत यांचा जेलबाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे. मागचे १०० दिवस संजय राऊत हे जेलमध्ये होते. पीएमएलए कोर्टाने दिलेल्या जामिनाविरोधात ईडीने हायकोर्टातही धाव घेतली, पण हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय योग्य ठरवला.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचं समजताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण राऊत कोठडीत असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचं थेट बोलणं होऊ शकलं नाही. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. संजय सावंत या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटणार आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्यानंतर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्य आनंदाचं वातावरण आहे. आर्थर रोड जेल आणि शिवसेना भवनबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे, तसंच संजय राऊत यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत.

संजय राऊत डरपोक नाहीत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.”

हे ही वाचा :

Sanjay Raut | १०० दिवसांनंतर वाघ पिंजऱ्यातून बाहेर ! | Shivsena | Uddhav Thackeray

जेलमधून बाहेर पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘आम्ही लढणारे आहोत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss