spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut : राऊतांच्या जामीनावर नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया; पहा कोण काय म्हणाले ? पिंजऱ्यातून वाघ बाहेर येतोय…

शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तब्ब्ल १०० दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार आहेत.

शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तब्ब्ल १०० दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. राऊतांच्या जामीनावर महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त होतोय. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केलेय. राऊतांना जामीन मिळाल्यानंतर कोण काय म्हणाले?

आदित्य ठाकरे –
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.”

सुषमा अंधारे –
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलं आहे अंडी त्यात त्या म्हणाल्या आहेत, Tiger is back..

 रोहित पवार –
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय. त्याला फक्त सत्यमेव जयते! असं कॅप्शन दिलेय. पिंजऱ्यातून एक वाघ बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ राऊतांनी पोस्ट केलाय.

 सुप्रिया सुळे –
संजय राऊत लवकरच बाहेर येतील. मी भविष्य सांगू शकत नाही. वास्तवतेत जगते. आमचे जे-जे नेते जेलमध्ये आहेत. ते त्यांच्या केसेसमधून निर्दोष बाहेर येतील. ते महाराष्ट्र, भारताच्या सेवेत पूर्ण ताकदीने लागतील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

अंबादास दानवे –
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या सांभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.

 उदय सामंत –
संजय राऊत सुटल्यानं आम्ही अडचणीत येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच न्यायालयाच्या निकालावर बोलण्यास त्यांनी नकार दिला, याबाबत आपल्याला माहित नसल्याचं ते म्हणाले.

हे ही वाचा :

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Facebook Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय, फेसबूकमधील तब्बल ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

हृतिकची प्रियसी सबा आझाद दिसणार रॉकेट बॉईजच्या दुसऱ्या सीझनमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss