spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील पोलीस गुंडांच्या दहशतीत?; गुंडांकडून पोलिसांवरच गोळीबार

पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरफोडीतील आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पुणे शहर पोलिसांवर आरोपीने गोळीबार करत पळ काढल्याची घटना दौंड तालुक्यातील यवतमध्ये घडली आहे. या सगळ्या प्रकरणात एकाला अटक करण्यास पोलिसांना यश मिळालं आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकारणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे शहरातील उत्तमनगर येथील चोरीच्या प्रकरणातील एका आरोपीवर पुणे शहर पोलीस युनिट तीनच्या पोलीस पथकाने सापळा रचला होता. पण त्यादरम्यान एका आरोपिला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या आरोपीने पोलिसांवर गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उत्तमनगरमधील चोरी प्रकरणी एक आरोपी फरार होता . पोलिसांच्या युनिट नंबर तीनला तो आरोपी यवत येथील मानकोबावाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तेथे सापळा रचला होता.

पुणे शहर पोलीस युनिट तीनचे एक सहाय्यक फौजदार आणि तीन पोलीस कर्मचारी असे चार पोलीस खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन दाबा धरून बसले होते. आज पहाटे तीन वाजता मुख्य आरोपी हा मोटरसायकल वरून तेथे आला. त्याने घरासमोर गाडी लावली. त्याच्यासोबत अंजु त्याचा साथीदार होता . तेवढ्यात पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतले, पण त्याचवेळी मुख्य आरोपीचा साथीदार हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. जाताना मुख्य आरोपीच्या साथीदाराने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यातून कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली नाही. मात्र मुख्य आरोपीच्या साथीदारा तिथून फरार झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार आणि सरकारी कामात अडथळा आणल्यानुसार मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे आणि निहालसिंग मन्नूसिंग टाक असे या फरार झालेल्या आरोपीचा नाव असून त्याच्या पोलिसांकडून शोध सुरु आहे.

हे ही वाचा :

जेलमधून बाहेर पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘आम्ही लढणारे आहोत…

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Bharat joda yatra : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss