spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर शरद पोंक्षे संतापले म्हणाले, पुरोगाम्यांची फालतूगिरी…

चुकीचा इतिहास दाखवून प्रेक्षकांची आणि महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर केला. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी चांगलेच राडे घातले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील यात सहभागी होते. या चित्रपटावरील वाद आता चांगलाच शिगेला पोहचला आहे. या चित्रपटावर आता अभिनेते आणि शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत खरपूस शब्दात राष्ट्रवादीचा समाचार घेतला.

“चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. शासनाने तिथे हुशार माणसं नेमली आहेत. कोणता प्रसंग इतिहासातील कोणत्या प्रसंगावर आधारित आहे याचे पुरावेही त्यांना आपल्या दिग्दर्शकाने दिले आहेत. पण सिनेमा रिलीज झाल्यानतंर दोन आठवड्यांनी अचानक यांना सुचलं का?,” असा संताप शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : “सावरकर, लोकमान्य टिळकांप्रमाणे मीही जेलमध्ये एकांतात होतो”

 

प्रेक्षकांना मारुन चित्रपटगृहातून बाहेर काढलं जात असल्यासंबंधी विचारल्यानंतर ते म्हणाले, हा तर हलकटपणा आहे. म्हणजे सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला सिनेमा चालू असताना तुम्ही प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढता. या विरोध करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं ते सिनेमा बनवणाऱ्याला नाही का? तुम्ही काय गुंड आहात? आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. शाहू, फुले, आंबेडकर यांनी हेच शिकवलं का?

‘राज्यातील सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही फालतू गिरी सुरू असल्याचा गंभीर आरोप पोंक्षे यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. पुरोगाम्यांना हिंदू राष्ट्र म्हणणं आवडत नाही. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र नको आहे याचा त्यांना‌ त्रास होतो. सत्ता गेल्याने यांची फालतू गिरी चालू आहे.’ असे गंभीर आरोप त्यांनी राष्ट्रवादीवर केले.

शरद पोंक्षे यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’ , ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं दुसरे वादळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.

Sanjay Raut : तुरुंगातून बाहेर येताच राऊत घेणार राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नेत्याची भेट

Latest Posts

Don't Miss