spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ENG : भारताने इंग्लंडला दिलं १६९ धावाचं आव्हान

भारताने दमदार खेळी दाखवत इंग्लडला १६९ धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अँडलेड ओव्हल मैदानात टी२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली असून त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. ज्यानंतर किंग कोहली आणि कुंग फू पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अशी अर्धशतकं झळकावत १६८ पर्यंत धावसंख्या नेली आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी इंग्लंडला आता १६९ धावा करायच्या आहेत. हार्दिक पांड्याने ३६ चेंडूत दमदार ६३ धावांची खेळी केली मात्र तो शेवटच्या चेंडूवर हिटविकेट झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर चौकार मारून देखील भारताला १७० च्या पार जाता आले नाही.

अँडलेड : विराट कोहलीचा विश्वविक्रम आणि हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकावत तुफानी फटकेबाजी केली, त्यामुळेच भारताला सेमी फायनलच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारता आला. विराट कोहलीने या सामन्यात ४० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. कोहलीला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. त्यामुळेच भारताला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १६८ अशी मोठी धावसंख्या उभारता आली.

भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण त्यावेळी संघाचा डाव सावरला तो कोहलीने. कारण यावेळी फक्त संघाला डाव सावरला नाही तर त्याने विश्वविक्रमही रचला. कोहलीने आता टी-२० क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम करत आपल्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कोहली किती धावा करतो आणि भारतीय संघाला विजय मिळवता येतो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल. टी-२० वर्ल्डकपचा विचार केल्यास ५ सामन्यात त्याने १२३च्या सरासरीने २४६ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढत एडिलेडवर आहे. हे मैदान विराट कोहलीसाठी लकी ठरले आहे. या मैदानावर सर्व फॉर्मेटमध्ये त्याने ७५.५८च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

हे ही वाचा :

Abdul Sattar: अब्दुल सत्तार म्हणतात मी ‘सुरक्षित’…

Maldives Fire : मालदीवची राजधानी मालेमध्ये भीषण आग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss