spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी (For the disabled) स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशपातळीवर हा मोठा निर्णय असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. दिव्यांगांसंदर्भात कालच मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. आपण आज मंत्रालयासमोर लाडू वाटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. ”ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, चालता-बोलता येत नाही, दिसत नाही त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आहे. दिव्यांगांच्या लढ्यामध्ये हे आमचं मोठं यश आहे” अशा भावना आमदार कडूंनी व्यक्त केल्या. या मंत्रालयाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडेच येईल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यासंदर्भात मान्यता दिल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली.. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावं म्हणून बच्चू कडू अनेक वर्षांपासून संघर्ष करत होते. अखेर त्यांच्या लढ्याला आज यश आलंय. दरम्यान बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लाडू वाटून निर्णयाचं स्वागत केलं.

हे ही वाचा :

IND vs ENG : भारताने इंग्लंडला दिलं १६९ धावाचं आव्हान

Abdul Sattar: अब्दुल सत्तार म्हणतात मी ‘सुरक्षित’…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss