spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MEGA BLOCK : ‘या’ दिवशी मध्य रेल्वेवर तब्बल २७ तासांचा जम्बो मेगा ब्लॉग; एक्स्प्रेस देखील रद्द

मुंबईतील चाकरमान्यांसाठी, सर्वसामान्य नागरिक आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भायखळा स्टेशन दरम्यान असणारा एक पूल पाडण्यासाठी २७ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबईतील चाकरमान्यांसाठी, सर्वसामान्य नागरिक आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भायखळा स्टेशन दरम्यान असणारा एक पूल पाडण्यासाठी २७ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये मध्य आणि हार्बर मार्गावरील या लोकल फेऱ्या बंद राहतील. मध्य मार्गावरील लोकल फेऱ्या १७ तासानंतर आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या २१ तासानंतर सुरु होणार आहेत. हा ब्लॉक १९ ते २१ (शनिवार आणि रविवारी) नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. याचा परिणाम रेल्वेच्या तीन मार्गावर होणार आहे. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू शकतो.

रेल्वे प्रशासनानं कर्नाक पूल पाडण्यासाठी २७ तासांचा ब्लॉक घेतला आहे. हा पूल पाडण्यासाठी १९ नोव्हेंबरला मध्यरात्री ११ वाजता ब्लॉक सुरु होईल, तर तो २१ तारखेपर्यंत सुरु राहील. कर्नाक पूल हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मशीद बंदर या स्टेशन दरम्यान आहे.

अप आणि डाऊन स्लो मार्गावरील : १९ नोव्हेंबर शनिवार २३:०० वाजता ते २० नोव्हेंबर रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत असा १७ तासांचा मेगा ब्लॉग असेल.
अप आणि डाऊन फास्ट लाईनवर : १९ नोव्हेंबर शनिवार २३:०० वाजता ते २०नोव्हेंबर रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत असा १७ तासांचा मेगा ब्लॉग असेल.
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर : १९ नोव्हेंबर शनिवार २३:०० वाजता ते २० नोव्हेंबर रविवार सायंकाळी ८ वाजेपर्यंत असा २१ तासांचा मेगा ब्लॉग असेल.
सातवी लाईन आणि यार्ड : १९ नोव्हेंबर शनिवार २३:०० वाजता ते २१ नोव्हेंबर सोमवार सकाळी दोन वाजेपर्यंत असा २७ तासांचा मेगा ब्लॉग असेल.

ब्लॉक कालावधीत खालील मार्गावर कोणतीही लोकल धावणार नाही –
अप आणि डाऊन हार्बर लाईन : वडाला रोड ते सीएमएमटी (VADALA ROAD to CSMT)
अप आणि डाऊन स्लो लाईन : भायखळा ते सीएसएमटी ( BYCULLA to CSMT)
अप आणि डाऊन फास्ट लाईन : भायखळा ते सीएसएमटी (BYCULLA to CSMT)

कोणत्या मार्गावर लोकल पूर्णपणे बंद:
मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाला रोड ते सीएसएमटी या मार्गावर लोकल बंद असतील.
रविवारी २० नोव्हेंबर रोजी एसी लोकल बंद असतील.
ब्लॉग कालावधीत मध्य मार्गावरील ट्रेन भायखळा येथून निघतील. तर हार्बर मार्गाच्या ट्रेन वडाला रोड येथून सुटतील.

ब्लॉक कालावधीत ३६ मेल एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द राहणार असून दादर, पनवेल, नाशिक आणि पुणे या ठिकाणी ६८ मेल-एक्स्प्रेस अंशतः रद्द राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानं ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात आलेल्या गाडयांच्या आरक्षणाचे पैसे प्रवाशांना परत देणार असल्याची माहिती दिली आहे. रेल्वेच्या जंक्शनच्या ठिकाणी प्रवाशांना पैसे करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाला भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भागात बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्यावी, अशी माहिती दिली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.

हे ही वाचा :

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार

IND vs ENG: विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय T-20 क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण

IND vs ENG : भारताने इंग्लंडला दिलं १६९ धावाचं आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss