spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य ११ नोव्हेंबर २०२२, तुमच्या मनातील संशय आणि संभ्रम दूर होण्याची आवश्यकता आहे

मेष : आजचा दिवस भरपूर कला गुणांनी भरलेला असेल. मंगल कार्याच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता आहे. आपले गुरु किंवा सद्गुरू यांच्या वचनाची दिव्य अनुभूती घेता येईल. प्रेमळ शब्दांनी तुमची स्तुती केल्याने मनस्वी आनंद होईल. प्राकृतिक कारणाने निर्माण झालेली मानसिक स्थिती सुधारेल. कलाकारांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल,

वृषभ : तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा आजचा दिवस आहे. तुमच्यातील कलागुणांमुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. चित्रकला प्रदर्शन अथवा स्पर्धा- नवीन चित्रपटाचे प्रदर्शन – कलाकृतींची निर्मिती यासाठी आजचा दिवस उत्तम राहील. विशेष करुन स्त्रियांना आजचा दिवस नवचैतन्य -स्फूर्ती-आनंद देणारा आहे. उच्च प्रतीची सौंदर्य साधने – उंची कपड्यांची खरेदी आज करू शकाल.

मिथुन : तुमच्यातील व्यापारी गुणांत आज वाढ होण्याची शक्यता आहे. काही भावनिक प्रसंगामुळे आपण आज आर्थिक बोजा वाढवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्त्रियांच्या प्रलोभनांपासून दूर रहाणे हितकारक ठरेल . गुप्त विकारांबाबत विशेष काळजी घ्यावी. इतरांशी तुम्ही सौजन्याने वागण्याचा केलेला प्रयत्न आज तुमचा मनस्ताप वाढविणारा ठरू शकतो.

कर्क : मातुळाकडून आपणांस मदत मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्यातील कलाकार जागृत होऊन अगदी सहजतेने अनेकांचे मनोरंजन कराल. निसर्गरम्य पर्यटनस्थळी जाण्याचे योग्य संभवतात. मित्रमैत्रिणींसोबत आनंदात जाईल. नवीन कलादालनाची सुरुवात अथवा त्याच्या उदघाट्नच्या प्रसंगी उपस्थित रहाण्याचे योग संभवतात.

सिंह : आज जर आपण आपल्या भावनांना आवर घालू शकत नसाल तर जवळच्या कळत मनोवैज्ञानिकाच्या उपचारांची गरज भासू शकते. तुमच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूनच परिस्थिती हलण्याची गरज आहे. विशेष करून आपण मोठ्या अधिकारी पदावर असाल तर लाच प्रकरणात आपणास कायदर्शित बाबींचा ससेमिरा पाठीशी लागू शकतो.

कन्या : आज आपण आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करायला सुरुवात कराल. व्यापार उद्योगात उत्तम लाभ मिळू शकतील. तुमच्या कलाकौशल्याने तुमची तुमचे स्नेहसंबंध अधिक वृद्धिंग कराल. तुमच्या वागण्या बोलण्याती सहजता इतरांना भावेल . तुमच्यातील आदर्श कलागुणांची दखल समाज घेईल. तुमची कर्मनिष्ठता तुम्हाला आज एका उच्च पातळीपर्यंत जाण्यास मदतगार ठरेल.

तुला : तुमच्यात आज रसिकता अधिक वाढेल. नाटक – चित्रपट अशा कला अविष्काराचा आनंद घ्याल. कलाक्षेत्रासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या प्रशंसेमुळे तुम्ही आज अत्यन्त भावुक होण्याची शक्यता आहे. विशेष करून कपडा व्यापारी अथवा स्त्री सौंदर्य प्रसाधने या क्षेत्र जी मंडळी काम करतात अशा मंडळींना आर्थिक लाभ होऊ शकतील.

वृश्चिक : आपणांस आज वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यता आहे. काट्याचा नायटा करणे या म्हणीची अनुभूती येऊ शकते, आपल्या वागण्या बोलण्यातून अकारण विरोधकांना संधी देऊ नका, ज्यांना मधुमेह – रक्तदाब असे विकार आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. व्यसनाधीनता वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

धनु : आज तुम्ही कोणत्या तरी धर्म स्थळाला भेट द्याल. तुमच्या हातून सत्कर्म घडेल. घरासाठी कर्जाची मागणी केली असल्यास ती पूर्ण होईल. जुने वाहन खरेदी करणे- घराची रंगरंगोटी करणे अशा विषयांवर आज सकारात्मक चर्चा घडून येईल. तुमच्या स्वभावातील नेतृत्वगुण आणखी विकसित होण्यास मदत मिळेल. उत्तम प्रतिभाशाली काव्य लेखन करू शकाल.

मकर : तुमच्या मनातील संशय आणि संभ्रम दूर होण्याची आवश्यकता आहे, मनातील हि साशंकता तुम्हाला तुमच्या प्रगतीस अडथळा ठरू शकेल. कोणत्याही विषयात निवृत्तीकडे मन वळणे हि बाब घटक ठरू शकते. प्रवलम्बी जीवनापेक्षा स्वावलंबी जिनाकडे कशी वाटचाल करता येईल याचा अभ्या वाढवावा. आपण घेतलेलं शिक्षण व्यर्थ जाणारा नाही याची काळजी घ्या.

कुंभ : आज आपणास कोणीतरी उत्तम मार्गदर्शक भेटेल. आजचे निर्णय भविष्यातील काळासाठी अत्यन्त फायदेमंद ठरू शकतात. भाग भांडवली बाजारात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दलालांच्या मदतीने आपण आपले काम पूर्णत्वास नेऊ शकाल. रोकड आर्थिक व्यवहार टाळावेत. आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी झाल्याने अनेक विषयातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

मीन : आज आपण प्रत्येक ठिकाणी केंद्रस्थानी असणार आहेत. तुमचे प्रत्येक पाऊल,तुमचा प्रत्येक शब्द आणि तुम्ही व्यक्त केलेला दृष्टिकोन अत्यन्त महत्वाचा असेल. तुमच्यावर विसंबून रहाणारी मंडळी आज अधिक उत्तम कार्यक्षमतेची आशा व्यक्त करू शकतात. तुमच्या संकल्पना आणि त्याविषयी केलेले संभाषण तुमच्या ग्राहक वर्गात विश्वास निर्माण करील.

Latest Posts

Don't Miss