spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jitendra Awhad : पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांना अटक, कार्यकर्ते संतापले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) यांना ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये घुसून ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा शो रद्द केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) यांना ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये घुसून ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा शो रद्द केला होता. यावेळी एका प्रेक्षकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित प्रेक्षकाला मारहाण केली होती का ते अधिकृतपणे स्पष्ट झालं नव्हतं. या प्रकरणी शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचादेखील समावेश आहे. जितेंद्र आव्हाड यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पण त्यांच्या अटकेनंतर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करुन आपल्याला अटक करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले. या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आपल्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिलीय. आपण गुन्हा कबूल करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडलीय.

वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर महिला कार्यकर्त्यांकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढली. या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवर निषेध व्यक्त केला जातोय. कार्यकर्त्यांचा रोष पाहता वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा परिसरात वाढवण्यात आलाय. या सगळ्या घडामोडींदरम्यान जितेंद्र आव्हाड यांची सुटका कधी होणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे कोर्टात दाखल करण्यात आलंय. तिथे पोलीस नेमकी काय भूमिका मांडतात आणि प्रकरण कुठपर्यंत जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

तसेच या सर्व प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे आणि यामध्ये ते म्हणले आहेत कि, “आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

Latest Posts

Don't Miss