spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sankashti Chaturthi 2022 : उपवास करता पण संकष्टी चतुर्थीचं महत्त्व माहिती आहे का?

हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज उपवास १२ नोव्हेंबरला (November) केला जाणार.

हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज उपवास १२ नोव्हेंबरला (November) केला जाणार. चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित मानली जाते. या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा (ganesh pooja) केल्यास सर्व संकटं दूर होतात असे मानले जाते. आज संकष्टी चतुर्थीची शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.

संकटांचं हरण करणारी चतुर्थी असा संकष्टी चतुर्थीचा अर्थ होतो. संस्कृत भाषेत संकष्टी या शब्दाचा अर्ध, कठीण काळापासून मुक्ती मिळणे असा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी विधीवत श्री गणेशाची पूजा केली जाते आणि दिवसभर व्रत पाळले जाते. संकष्टी चतुर्थीला लोक सुर्योदयापासून ते चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात.

या दिवशी भगवान गणेशाची (Ganpati) पूजा केली जाते. श्रीगणेश हा भक्तांसाठी संकटमोचन मानला जातो. असे म्हणतात की, श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने आणि उपवास केल्याने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी व्रत केल्यास श्री गणेशाच्या आशिर्वादाने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाचे व्रत ठेवल्याने आणि या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा केल्याने बाप्पांचे आशिर्वाद प्राप्त होतात. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.


संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त – 

हिंदू दिनदर्शिकेनुसार सध्या कार्तिक महिना सुरू आहे. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे. परंतु ११ नोव्हेंबरलाच रात्री १०.२५ वाजता चतुर्थी तिथी आरंभ होईल आणि १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ०८.१७ वाजता समाप्ती होईल. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी १२ नोव्हेंबरला साजरी केली जाईल. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ८:२१ वाजता असेल असे सांगितले जात आहे.

संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०२ ते ०९.२३ पर्यंत आहे. याशिवाय दुपारी ०१:२६ ते सायंकाळी ०४:०८ असाही शुभ मुहूर्त आहे. या दिवशी राहुकाल सकाळी ०९:२३ ते १०:४४ पर्यंत आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजास्थान स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. यानंतर श्री गणेशाल वस्त्र अर्पण करा आणि देवघरात दिवा लावा. श्री गणेशाला तिलक लावून फुले अर्पण करा. यानंतर गणपतीला २१ दुर्वा आणि साजूक तूपातील लाडू किंवा मोदक अर्पण करा. पूजा संपल्यानंतर श्री गणेशाची आरती करा. आरतीनंतर पूजेत काही चूक झाली असेल तर श्री गणेशाची क्षमा मागावी आणि व्रताचा संकल्प घ्यावा.

हे ही वाचा : 

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळे संतप्त

Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

Jitendra Awhad : पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांना अटक, कार्यकर्ते संतापले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss