spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sushma Andhare: विभक्त पती वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया…

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात.

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करतात. त्याच सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे (Vaijanath Waghmare) हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

जर गेली चार पाच वर्ष मी त्यांच्यापासून विभक्त आहे, तर व्यक्ती म्हणून त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. मी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देईल. ते राजकारणात होते की नाही मला माहीत नाही. त्यांचं नेमकं काय चाललं होतं हेही मला माहीत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचं कारण नाही. भावना गवळी शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रत्येक व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य आहे. मी गेली काही वर्ष त्यांच्यापासून विभक्त आहे. तर त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं? कुठे जाऊ नये? हा त्यांचा प्रश्न आहे. तो विषय चर्चेचा होण्याचं कारण नाही. भविष्यात काय चित्रं असेल हे सांगता येत नाही. पण त्यावेळी कर्तव्य हे श्रेष्ठ असेल. मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या. वैजनाथ वाघमारे तुमच्याबाबत काही गौप्यस्फोट करणार आहेत. काय गौप्यस्फोट असेल? असा सवाल अंधारे यांना विचारण्यात आला. त्यावर, त्यांच्याकडे काही असेल तर मला माहीत नाही. माझं आयुष्य मी स्वाभिमानाने जगते. महिला म्हणून आपण रडतखडत बसावं असं वाटत नाही. प्रत्येक गोष्टी सहन करण्याची माझी तयारी आहे. मी मेंटली तयार आहे. येणारा प्रत्येक वार झेलायला मी तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.

माझं का खच्चीकरण होईल असं मी काय केलं? माझ्या आयुष्यात एक नाव सोडून दुसरं नाव जोडलं गेलं का? माझं का म्हणून खच्चीकरण होईल? कधी काळी माझ्या आयुष्याचा एक जोडीदार म्हणून जगलेला माणूस, ज्याच्यापासून मी अनेक वर्ष विभक्त राहते, माझं वेगळं आयुष्य जगते. त्यांच्या जाण्या-येण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होतो असं मी का मानावं? किंबहुना मी आता त्यांना माझा मित्र हितचिंतक मानत नसेल तर शत्रू का मानावं? हा मुद्दाच असू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. तुमची कायद्याची पदवी बोगस असल्याचं सांगितलं जात आहे, असं विचारलं असता, माझ्याकडे एलएलबीची डिग्री आहे असं मी कधीच म्हटलं नाही. मला हे हस्यास्पद वाटतं. कुणाचा तरी व्यक्तिगत भूतकाळ काढण्याची माध्यमांची जबाबदारी असू नये, असं त्या म्हणाल्या.

वैजनाथ वाघमारे यांनीही पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं, की वैजनाथ ‘आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे, असी माहिती वाघमारे यांनी दिली.

हे ही वाचा :

Jitendra Awhad: ”महाराज, तुम्हाला शब्द देतो.. तुमचा हा मावळा…” भावनिक होत आव्हाड म्हणाले

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच गोरी नागोरीने केला खुलासा; म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss