spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Weather Update Today : तमिळनाडूत आज पावसाचा रेड अलर्ट, तर बर्फवृष्टीमुळे ‘या’ राज्यात शाळा बंद

सध्या देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे, तर काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.

सध्या देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे, तर काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या प्रदुषणामुळं लोकांचे हाल होत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आज (१४ नोव्हेंबर) आणि उद्या (१५ नोव्हेंबर) ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडं तामिळनाडूमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. आजही तिथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात तमिळनाडूसह केरळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

हेही वाचा :

भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट ; नाना पटोले

 

इतर राज्यात, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. कर्नाटक किनारपट्टीवर एक-दोन ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाख प्रदेशातील काही भागात बर्फासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताच्या काही भागांमध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊ शकते.

तामिळनाडूत पाऊस, शाळा बंद

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज १४ नोव्हेंबर २०२२ रोजीही या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. IMD ने जारी केलेल्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर आजही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही पावसामुळे तमिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ७२ तासात दुसरा गुन्हा दाखल

महाराष्ट्रात हवामानाची स्थिती

बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाळी स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमान वाढले आहे. पुढील दोन दिवसात पुन्हा रात्रीच्या तापमानात घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र परिसरातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान घसरू लागले आहे. आज रविवारी रात्रीही अनेक भागात थंडी पडल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला. राज्यातील काही भागात अजूनही तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय

Latest Posts

Don't Miss