spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकारला पाहिजे’ ; चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पुण्यात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांमार्फत आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत.

पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे वातावरण आहे. गेल्या ४० वर्षांसापासून एकाच घरात सत्ता आहे. त्यामुळे तेथील लोक बाहेर बैठकीत येण्यासही घाबरतात. राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच आव्हाड यांना निलंबित केले पाहिजे. ज्या कारणासाठी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्या कृतीचे समर्थन करून बोलणाऱ्यांचे नाव गुन्ह्यात सहभागी करण्याची मागणी आहे. राज्य सरकारने संवेदनशील मार्गाने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेचा ‘बहीण’ म्हणून उल्लेख, जयंत पाटील यांनी जुना दाखवला व्हिडीओ

जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळीच राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलंय. मात्र आव्हाड हे नौटंकी करत आहेत. हि्ंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने आपला राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.

केतकी चितळे म्हणाली…

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. या अटक प्रकरणात केतकी चितळे हिने उडी घेतली असून चितळे यांच्या वकिलांनी पोलिसांना पत्र देत आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.आता यावरच राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून शेख यांनी सांगितले की, केतकी चितळेला डोक्याचा काही भाग नाही तशा महिलेवर मी बोलणं यात काही पॉईंट नाही.

Gold Rate : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी, चोवीस तासातदरात १५०० रुपयांची वाढ

Latest Posts

Don't Miss