spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जितेंद्र आव्हाड प्रकरणी नीलम गोऱ्हेंनी दिली प्रतिक्रिया, थेट कंगनाशी केली केतकी चितळेची तुलना

तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असेही म्हटले आहे. तसेच या प्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या वक्तव्यावर देखील नीलम गोऱ्हे यावेळी बोलल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे कृत्य जाणूनबुजून केले आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची यावी अशी मागणी देखील पीडित महिलेने केली आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधातल्या या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विनयभंग झाला आहे का नाही याचा निर्णय कोर्ट देईल आणि जे समोर येईल त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत असं व्हिडिओ मध्ये दिसतंय असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असेही म्हटले आहे. तसेच या प्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या वक्तव्यावर देखील नीलम गोऱ्हे यावेळी बोलल्या. त्या म्हणाल्या, केतकी चितळे हिच्या रूपाने महाराष्ट्रमध्ये मिनी कंगना राणावत जन्माला येते आहे.

काय म्हणाली होती केतकी चितळे?

ठाण्यातील विवियाना मॉल येथे हर हर महादेव चित्रपटात्या शो दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य सर्व पूर्व नियोजित होते त्यामुळे त्यांच्यावर कलम १२० (ब) तसेच विनयभंग (३५४) ही कलमे लावण्यात यावी. अन्यथा, आम्ही हायकोर्टात दाद मागू अशी नोटीस केतकी चितळेने पोलिसांना पाठवली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात यावे. कारण ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यावेळी त्या व्यक्तीची पत्नीही तिथे होती. त्यांनाही मारहाण झाली. कलम १२० (ब) लावण्यात यावे, कारण मॉलमधील धूडगूस हा प्लॅनिंगचा भाग होता. ते सर्व प्री प्लॅन होते.

तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी मुख्यामंत्री आणि उपमवख्या यांना देखील चांगलाच टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणताच त्यांच्यावर काही लोकांनी टीका केली.राजकारणात एकमेकांच्या विरोधात हिन पातळीवरचे वाभाडे काढणे सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असं त्या म्हणाल्या तर बालदिनानिमित्त मुंबईतील शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात उशिरा पोहोचल्यामुळे त्यांनी, मुख्यमंत्री यांनी शाळेचे विद्यार्थी म्हणजे गुवाहाटीला नेलेले आमदार नाही हे लक्षात घ्यायला हवं, अशी खोचक टीका केली तर ५० खोक्यांवरून बोलले तर एवढं का वाईट वाटतं? असा सवाल करत आम्ही मुख्यमंत्र्यांना रुमाल भेट देणार आहोत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

हे ही वाचा:

Ajit Pawar : व्हिडीओत विनयभंग झाल्याचे दिसत नाही ; अजित पवार

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेचा ‘बहीण’ म्हणून उल्लेख, जयंत पाटील यांनी जुना दाखवला व्हिडीओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss