spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

या दाक्षिणात्य अभिनेत्याची तब्येत बिघडली, तात्काळ रुग्णालयात दाखल केले

विक्रमच्या छातीत दुखू लागल्याने त्याला त्वरित चेन्नई येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.

मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम (Chiyan Vikram) याची तब्येत बिघडली असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विक्रमच्या छातीत दुखू लागल्याने त्याला त्वरित चेन्नई येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. चाहत्यांकडून चियान विक्रम च्या तब्येती बद्दल ट्विटर वर ट्विट करण्यात येत आहे. South actor Chiyan Vikram suffering from health issue
मीडिया रिपोर्ट्सनुसार चियान विक्रमला हृदय विकाराची समस्या निर्माण झाल्याचं बोलले जातेय. मात्र संबंधित दवाखाना आणि डॉक्टरकडून याबाबत अधिकृतरित्या काहीच माहिती समोर आलेली नाही. मागील काही दिवसांपासून विक्रम ला ताप येत होता. त्यामुळे त्याच्या छातीत वेदना होत होत्या असं बोललं जातंय.
विक्रमच्या तब्येतीबद्दल चाहत्यांना माहिती मिळताच सर्व त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. सोबतच काही चुकीच्या अफवा पसरवू नका असे चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. मागच्या काही दिवसांपासून विक्रम आगामी पोन्नीयीन सेलवन चित्रपटाचे शूटिंग करत होता. २०१९ मध्ये विक्रम कदारम कोंडण या चित्रपटात शेवटचा दिसला होता. लवकरच त्याचा ११ ऑगस्ट ला कोबरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.

Latest Posts

Don't Miss