spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“माझ्या वडिलांवर जे आरोप करण्यात आले आहे ते…”, विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची प्रतिक्रिया

माझ्या वडिलांवर जो आरोप करण्यात आला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे विविध पक्षातील नेते पुन्हा आमने सामने आले आहेत. आतापर्यंत या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ज्यात काही प्रतिक्रिया ह्या जितेंद्र आव्हाड याच्या बाजूने आहेत तर काही विरोधात. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने त्यांच्यावर झालेल्या या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिल्यानंतर आता त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्या वडिलांवर जो आरोप करण्यात आला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे. या आरोपांमुळे माझ्या परिवाराला मानसिक त्रास होतो आहे. काल रात्रीपासून माझे वडील आणि आम्ही झोपलेलो नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड हिने दिली आहे. “राजकारणात असे वादविवाद होत राहतात. मात्र, या पद्धतीने जेव्हा तुम्ही आरोप करता, तेव्हा त्याचा परिणाम एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण परिवारावर होत असतो. महिलांच्या सुरक्षेसाठी हे कायदे बनवले आहेत. मात्र, याचा गैरवापर होत असेल तर त्याचा परिणाम इतर महिलांवरही होतो”, असेही ती म्हणाले.

नेमके काय आहे प्रकरण?

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर रविवारी कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलंय.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना दिल्ली हायकोर्टाकडून मोठा धक्का; निवडणूक आयोगाच्या बाजूने दिला निर्णय?

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार? दीपक केसरकारांच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss