spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांच्या मध्यरात्रीच्या बैठका सुरूच; नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. या दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती हाती येत आहे. मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास उपमुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडले. कालच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : 

Thackeray vs Shinde : ठाण्यातील किसन नगर येथे, शिंदे गट आणि ठाकरे गटात हाणामारी

या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार तसंच जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणाविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं नियोजन सुरू आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही जाहीर केली जाणार असल्याची चिन्ह दिसत आहे. या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यमंत्र्यांचाही समावेश असेल. काही नव्या दमाच्या चेहऱ्यांना यामध्ये संधी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र रात्री उशिरा झालेल्या या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी अशाच रात्री उशिरा बैठकी झाल्या आहेत. त्यामुळे आता या बैठकीनंतर कोणता महत्त्वाचा निर्णय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

गरोदर पणात कोणता आहार घ्यावा, जाणून घ्या…

दरम्यान, मुखमंत्री बैठकीत असताना ठाण्यात मोठा राडा झाला. ठाण्यातील किसननगर परिसरात उद्धव ठाकरे यांना मानणारे आणि एकनाथ शिंदे यांना मानणारे शिवसैनिक आमने सामने आले. ठाकरे गटाकडून ठाण्यात किसननगर परिसरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर परिसरात ठाकरे शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे देखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सुरुवातीला घोषणाबाजी केली आणि नंतर या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं आहे.

सोलकडीचे पिण्याचे फायदे जाणून घ्या…

Latest Posts

Don't Miss