spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kieron Pollard : मुंबई इंडियन्सचा लाडका खेळाडू किरॉन पोलार्ड निवृत्त, भावुक पोस्ट केली शेअर

इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. IPL २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. या ऑक्शन आधी ट्रेडिंग विंडोतून कोलकाता नाइट रायडर्सने ल्युकी फर्ग्युसन व रहमनुल्लाह गुर्बाझ यांना गुजरात टायटन्सकडून, तर दिल्ली कॅपिटल्सच्या शार्दूल ठाकूरला आपल्या ताफ्यात घेतले. मुंबई इंडियन्स IPL २०२३ मध्ये संघातील सर्वात अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड याला वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूनेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.

हेही वाचा : 

मारेकरी आफताब सायको किलर?, श्रद्धाची हत्या, दुसरीशी शरीरसंबंध, तर तिसरीला…

पोलार्डने आपली संपूर्ण आयपीएल कारकीर्द मुंबईसोबत घालवली आहे. त्याने १७१ डावात ३ हजार ४१२ धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी २८.६७ होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट १४७.३२ इतका होता. १६ अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एका दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डने मागील हंगामात खास कामगिरी केली नाही. त्याने ११ सामन्यांत १४.४० च्या खराब सरासरीने केवळ १४४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ १०७.४६ होता. ज्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.

पोलार्डने याआधीच्या कित्येक हंगामात मुंबईसाठी अविस्मरणीय खेळी खेळल्या. कित्येक सामने तर हातोहात फिरवून मुंबईला ‘यादगार’ विजय मिळवून दिले. प्रतिस्पर्ध्यांवर तो असा चाल करायचा ज्याने समोरील संघाची मती गुंग व्हायची. पण मागील वर्षी पोलार्डची बॅट त्याच्यावर रुसली. संपूर्ण हंगामात त्याची बॅट बोललीच नाही. बोलिंगमध्येही पोलार्डला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने केवळ चार विकेट्स घेतल्या.

Arun Gawali Parole : कुख्यात डॉन अरुळ गवळीला पॅरोल मंजूर

पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये आयपीएलचा १६ व्या हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी २३ डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.

Latest Posts

Don't Miss