spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mantralay : मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन; न्यायासाठी प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रियकराने आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रियकराने आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा यासाठी प्रियकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले.

मंत्रालयात (Mantralay) एका आंदोलन कार्यकर्त्यांने संरक्षण जाळीवर उडी घेतल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा चांगलाचं गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे संरक्षण जाळीवर उडी घेतल्यानंतर सुद्धा तो कार्यकर्ता घोषणा देत असल्याचं व्हिडीओ (Video) स्पष्ट दिसत आहेत. मंत्रालयात विविध कामानिमित्त आलेले नागरिक सुद्धा कार्यकर्त्याचं आंदोलन पाहत असल्याचं दिसतंय. दुपारच्या सुमारास उडी घेतल्यामुळे आंदोलन कर्त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

मंत्रालयात आज पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. बापू नारायण मोकाशी (वय ४३ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे. बापू मोकाशी यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या प्रेयसीवर अत्याचार होता, त्यासाठी त्या तरुणाने चारवेळा मंत्रालयात पत्र दिले होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा पत्र दिले होते. सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र दिले होते. पण कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नसल्याने हतबल झालेल्या आंदोलनकर्त्याने उडी मारली. सुरक्षा जाळी असल्यामुळे बचावला, पण जाळीत अडकल्याने जखमी झाला आहे. पुढील उपचारासाठी त्याला जीटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मागील काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यानिमित्ताने मंत्रालयात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच अचानकपणे बापू मोकाशी यांनी आपल्या मागण्यांवर कार्यवाही होत नसल्याने उडी मारली. या तरुणाने उडी मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. मंत्रालयातील पोलिसांनी तात्काळ सुरक्षा जाळी असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पडल्यानंतरही बापू मोकाशी काही वेळ तिथेच रेंगाळत होते. त्याच दरम्यान त्यांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. या दरम्यान पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते सुरक्षा जाळीवरून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही वेळ पोलिसांनी त्याची विचारपूस केली आणि ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे.

हे ही वाचा :

Uddhav Thackeray Live : स्मारक ताब्यात घेण्याचं स्वप्न त्यांनी बघावं, मग पाहू – उद्धव ठाकरे

OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर

राहुल गांधींच्या शेगावच्या सभेला उद्धव ठाकरेंची पाठ ?; उद्धव ठाकरे म्हणाले, सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss