spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ranjeet Savarkar : “राहुल गांधींना अटक करा”, रणजीत सावरकरांची मागणी

काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी सावरकरांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी सावरकरांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील केली होती. तसंच सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमच्या कुटुंबाची मागणी नसल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतना स्पष्ट केलं आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. त्यांना अंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आले तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते.” असे ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळातील वाद चांगलाच चिघळला असून थेट पोलिसांपर्यंत पोहचला आहे. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकडून या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. राहुल गांधींना सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी अटक करावी, अशी मागणी करत स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे.

पुढे ते म्हणाले की “राहुल गांधींनी प्रचारासाठी यात्रा काढली असेल तर काढावी. पण जर यातून फक्त देशभक्तांचा अपमान करण्याचे उद्योग होणार असतील तर या यात्रेवर बंदी घातली पाहिजे. काँग्रेसनेच हा पायंडा घातला आहे. शरद पवारांवर टीका होते तेव्हा ती व्यक्ती जेलमध्ये जाते. शरद पवारांची झालेली बदनामीही चुकीची होती. पण जो न्याय त्यांच्या बाबतीत दिला तोच राहुल गांधींच्या बाबतीत झाला पाहिजे. गुन्हा करणारी व्यक्ती लहान आहे की मोठी याकडे कायदा पाहत नाही. सावरकर हे निश्चितच शरद पवारांपेक्षा मोठे आहेत”.

“सावकरांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याचा संजय राऊतांना काय अधिकार आहे. तुमचे सहकारी पक्ष रोज सावरकरांना शिव्या देत आहेत. त्यांनी जेव्हा अश्लील लेख लिहिला होता, तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेलो होतो. मला भेट नाकारण्यात आली. जे पत्र दिलं त्याचं उत्तर देण्याचंही सौजन्य नाही. तुमच्या सहकारी पक्षांना साधं तुम्ही सांगू शकत नाही. सत्तेच्या मोहासाठी तुम्ही बदनामी खपवून घेता. आमच्या कुटुंबाने भारतरत्न देण्याची कोणतीही मागणी केलेली नाही आणि करणारही नाही,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

रणजीत सावरकरांनी लिहिलेले पत्र –

मी रणजित विक्रम सावरकर वय ५२ राहणार कमलकुंज, शिवसेना भवन पथ दादर (प) मुंबई ४०००२८ खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करू इच्छितो. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशीम येथे जारी सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली, असे खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे. याशिवाय सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते, अशी धादांत खोटी विधाने करीत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी विनंती करत आहे.

ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पाहिली. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीदेखील आज सकाळी (दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी) असेच वक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला. हे वृत्त मी दूरदर्शनवर पाहिले. माझे निवासस्थान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने ही तक्रार आपल्याकडे नोंदवत आहे. तरी आपण राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती.

काय म्हणाले होते, राहुल गांधी?

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

हे ही वाचा :

सभा सुरू असताना अचानक नितीन गडकरी यांना चक्कर आली; कार्यक्रम थांबवला

Mantralay : मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन; न्यायासाठी प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

या’ व्हिडिओमुळे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील VFX आर्टिस्ट होत आहेत ट्रॉल; पहा काय आहे या व्हिडिओमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss