spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Veer Savarkar: जर सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर…, चंद्रकांत पाटलांचं विधान

सरकार आणि वोटबॅंकपायी त्यांना मोह झाला आणि तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Savarkar) यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विविध नेत्यांनी आतापर्यंत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानाचा राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर निषेध केला जातोय. भाजप आणि शिंदे गटाकडून देखील त्यांच्या वक्त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जातेय. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत असं म्हटलं यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “अजानची स्पर्धा घेण याकडे गाडी चालली होती ती ट्रॅकवर आली. लव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयावर त्यांच्याही मनात आग पेटली ही चांगली गोष्ट आहे. ही कॉंग्रेसच्या पेटू शकत नाही. कारण ही त्यांची वोटबॅंक आहे. ही वोटबॅंक उद्धव ठाकरें यांची कधीच नव्हती. सरकार आणि वोटबॅंकपायी त्यांना मोह झाला आणि तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले. जर सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर ती सुधारणे सर्वसामान्यांना आवडेल”.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, “याचा अर्थ त्यांनी भाजपशी समझोता करून सरकार स्थापन केलं पाहीजे असं काही नाही. आता आम्ही खूप पुढे गेलो. आता आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सहज सरकार आणू, त्या निवडणुकांमध्ये आम्ही इतके मजबूत असू. त्यामुळे आम्हाला शिंदे यांची शिवसेना पुरेशी आहे.”

काय म्हणाले होते, राहुल गांधी?

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

हे ही वाचा:

माफीनाम्याच्या पत्रावर शेलारांकडून सावरकरांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी

राहुल गांधींच्या शेगावच्या सभेला उद्धव ठाकरेंची पाठ ?; उद्धव ठाकरे म्हणाले, सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss