spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! सरकारच्या घडामोडींना वेग, उद्या होणार एसटी कामगारांच्या १६ मागण्यांवर मोठा निर्णय?

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्ने हे उपस्थित राहणार आहेत.

आपल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. कमी काळ हा संप टिकेल असं अनेकांना वाटत असताना अपेक्षेपेक्षा अधिककाळ हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु राहिला आणि सामान्य नागरिक मात्र याने बेजार झाले. आपल्या विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात या उद्देशाने हा संप करण्यात आला होता. पण, आत याच एसटी कामगारांच्या संपाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कामागारांबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये एसटी कामगारांच्या मागण्यांच्या बद्दल विचार करण्यात येणार आहे. या बैठकीत एसटी कामगारांच्या मागण्यांविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या एसटी कामगारांची बैठक बोलावलीय. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, एसटी कामगारांसाठी मोठा निर्णय उद्या घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्ने हे उपस्थित राहणार आहेत. संबंधित बैठकीत एसटी कामगारांच्या DA च्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत एसटी कामगारांच्या १६ मागण्यांवर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे या बैठकीत डिझेल गाड्या महाराष्ट्रात वाढवण्यासाठी परवानगी अहवाल सादर केले जाणार असल्याची देखील माहिती आहे. एसटी कामगारांनी काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. एसटी कामगारांचा हा संप तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालला होता.या संपामुळे महाराष्ट्रातील शेकडो गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला होता. नागरिकांना प्रचंड तासाला सामोरं जावं लागलं होतं. ठाकरे सरकारने एसटी कामागारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.

हे ही वाचा:

Jitendra Awhad: विनयभंगाच्या प्रकरणानंतर ‘या’ ट्विटमुळे; जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेत

राज्यातील पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा; ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss