spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सावरकरांच्या मुद्यावरून BJP-MNS राजकारण करत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणीत आणत आहेत ; आ. रोहित पवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटत आहेत. एकीकडे भाजपकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. मात्र “जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं, तेव्हा हे लोक शांत का बसले?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सोबतच “हरहर महादेव चित्रपटात इतिहासात बदल करण्यात आला तेव्हा यांनी तोंड उघडलं नाही, हे कितपत योग्य आहे,?” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : 

Drushyam २ ची जोरदार सुरुवात; पहिल्याच दिवशी झाली एवढी कमाई

पुढे रोहित पवार म्हणाले, माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे. त्यामुळे आपण लढतो. पण सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. राहुल गांधींचा विरोध कमी होते पण शिंदे गटाचे काही लोक, बीजेपी आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.

भारत जोडो यात्रेत गेल्यानंतर मी त्यांना दोन वेळा भेटलो. आदिशक्ती आणि भक्ती शक्तीचं प्रतीक असलेली प्रतिकृती भेटवस्तू त्यांना दिली. उद्धव ठाकरे यांच्या फोटोचं संकलन असलेलं पुस्तक देखील त्यांना भेट दिलं. ग्रामीण भागात सारखी शहरी भागात देखील रोजगार हमीची योजना यावी, या आशयाचं निवेदन देखील मी त्यांना दिलं. ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात लोक या येथे स्वयंपूर्ण सहभागी होत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे.

Time Maharahstra Exclusive : धर्मवीरांचा गड केदार दिघे राखणार का?

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटले…

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे या वादाला तोंड फुटले. वि. दा. सावरकर यांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. पण, त्यांनी अंदमानातून इंग्रजांना पत्रे लिहून माफी मागितली होती. त्यांनी इंग्रजांचे काम केले. त्यांना इंग्रज पेन्शन देत होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात अंदमानातून सुटून आल्यानंतर ब्र काढला नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या विधानानंतर राज्यात ठिकठिकाणी भाजप आणि मनसेतर्फे निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी यांच्या पुतळ्याला आणि फोटोला काळे फासणे आणि जोडे मारणे आदी प्रकार आंदोलनकर्त्यांनी केले आहेत. मनसेने देखील राहुल गांधी यांचा निषेध केला आहे.

नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य; नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या…

Latest Posts

Don't Miss