spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kedar Dighe Exclusive : आनंद दिघेंचा राजकीय वापर नक्की कोण करतंय ?; केदार दिघे म्हणाले …

आनंद दिघे हे राजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या पाशात्य त्यांच्या नावाचा वापर होणं हे कुठेही वावगं नाही असे आज धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे टाईम महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत म्हणाले आहेत .

आनंद दिघे हे राजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या पाशात्य त्यांच्या नावाचा वापर होणं हे कुठेही वावगं नाही असे आज धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे टाईम महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत म्हणाले आहेत. आज (दि . १९ नोव्हेंबर) झालेल्या या मुलाखतीत केदार दिघे यांनी अनेक गोष्टींचा उलगडा हा केला आहे.

आनंद दिघे हे राजकीय व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या पाशात्य त्यांच्या नावाचा वापर होणं हे कुठेही वावगं नाही असे आज केदार दिघे म्हणाले आहेत. कारण राजकारणात असलेल्या माणसाचा वापर हा होणारच आहे . परंतु तो चुकीच्या पद्धतीने होता काम नये इतकेच माझं म्हणणं आहे असे म्हणत केदार दिघेंनी आपलं मत हे मांडले आहे. तसेच साहबांचे विचार , तत्व अश्या प्रकारची होती का ? साहेबांनी काय घडवलं ? काय केलं हे लोकांनी पाहिलेल आहे तसेच ठाणे महानगर पालिकेच्या काळात तेव्हा काय झालं होत हे देखील आपल्याला माहित आहे . त्यांनी कुठेही आपल्या तत्वांशी तडजोड केलेली नाही. कुठेही स्वार्थासाठी म्हणून कुठल्याही गोष्टीचा निर्णय हा घेतला नाही. त्यामुळे मला असं वाटत कि साहेबांच्या विचारांवर या विषयावर बोलू नये असे मत आज केदार दिघेंनी वक्त केलं आहे.

हे ही वाचा : Time Maharahstra Exclusive : धर्मवीरांचा गड केदार दिघे राखणार का?

आनंद दिघे हे काका आहेत तर अरुणा गडकरी या आत्या आहेत. तसेच अरुणा गडकरी आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे पहिल्यापासून कदाचित चांगले असतील तसेच त्यांनी शुभेच्छा दिल्या यात मला काही चुकीचं वाटत नाही. त्या माझ्या घरातल्या व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना मी नेहमी आदर देत आहे असे आज केदार दिघे म्हणाले आहेत.

तसेच सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जी कटुता आली आहे ती कधी सत्र संपेल का ? असं विचारले असता केदार दिघे म्हणाले, कटुता संपवायची हि माझी ईच्छा नक्कीच आहे कारण या मध्ये सर्वसामान्य शिवसैनिक हा भरडला गेला आहे. आपण सर्व शहरांत राहतो पण ग्रामीण भागातील नागरिक आपल्याला इथे बघून सांगता कि हा माझा नेता आहे. आज त्या नेत्याने अश्या पद्धतीचे पाऊल उचललं आहे त्यामुळे तो व्यथित झाला आहे. हा जो विश्वास घाट झाला आहे तो फक्त आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा नाही तर प्रत्येक शिवसैनिकांचा झाला आहे असे आज केदार दिघे म्हणाले आहेत.

हे ही वाचा :

सावरकरांच्या मुद्यावरून BJP-MNS राजकारण करत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणीत आणत आहेत ; आ. रोहित पवार

नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य; नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss