spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने केलं, भारत क्रिकेट संघाचे कौतुक

इंडिया v/s इंग्लंड T-20 क्रिकेट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा यांची शानदार कामगिरी इंग्लंडमध्ये सुरू आहे.

IND vs ENG T20 Match: इंडिया v/s इंग्लंड T-20 क्रिकेट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा यांची शानदार कामगिरी इंग्लंडमध्ये सुरू आहे. शनिवारच्या सामन्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T-20 मध्ये इंडियाने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे इंडियाने तीन सामन्याच्या मालिकेत दुसरी अशी बाजी यशस्वी केली आहे. या विजयामुळे केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदिही यांनी भारत क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून भारत क्रिकेट संघाचे कौतुक केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “भारतीय संघ अप्रतिम क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे भारत मालिका जिंकण्यास पात्र आहे. खरोखरच प्रभावी गोलंदाजी होत आहे. भारतीय संघ यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वात आवडत्या संघांपैकी एक आहे हे निश्चितच”.


भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता खेळाला सुरुवात होईल. आज होणारा तिसरा सामना जर भारतीय संघ जिंकला तर इतिहासात प्रथमच इंग्लंडला भारताकडून क्लिनस्विप मिळले. तर शेवटचा सामना जिंकून आपला ‘सफाया’ टाळण्यासाठी जोस बटलरचा संघ प्रयत्न करेल.

हेही वाचा : 

रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलंल्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण, इंस्टाग्राम हॅण्डलवरून दिली माहिती

Latest Posts

Don't Miss