spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सत्तेला चिटकून आहात महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय’; राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार आक्रमक झाले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपसह राज्यापालांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी राज्यपालांना पुन्हा माघारी पाठवण्याची मागणीदेखील राऊत यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा दळभद्री वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यातच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी मागितली असं विधान भाजपच्या प्रवकत्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा प्रश्न राऊतांनी केला आहे.

हेही वाचा : 

Happy Birthday Rajkumar Hirani : सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा आज यांचा वाढदिवस

पुढे राऊत म्हणाले, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? महाराजांनी कधी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा जाब भाजपला विचारणार की नाही?, वारंवार शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संभाजी महाराजांचा अपमान करायचा ही भाजपची भूमिका आहे का? शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली? हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. ते भाजपचे सहयोगी आहेत. मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली स्वाभिममानाचं तुणतुण वाजवलं. महाराजांचा अपमान होऊन 72 तास झाले. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांनी या घटनेचा साधा निषेध केला नाही. इतके तुम्ही घाबरता? हा भाजपने केलेला अपमान आहे. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

Megablock: १५४ वर्ष जुना कर्नाक पुलाचे पाडकाम सुरू,२७ तासांचा महाब्लॉक लोकलसह एक्स्प्रेसही रद्द

Latest Posts

Don't Miss