spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टाईम पास मधील दगडूची थेट बॉलिवूडमध्ये ,अभिनेता प्रथमेश परबने दिसणार ‘या’ चित्रपटात

अभिनेता प्रथमेश परबच्या टाइमपास ३ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट दगडू आणि पालवी या पात्रांच्या प्रेमकहाणीवर होता. हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला, टाइमपास चित्रपटाच्या तीनही भागांच्या रिलिजनंतर सिनेमागृह प्रेक्षकांनी गच्च भरलेले आढळले आहे. या चित्रपटातील दगडू या पात्राची भूमिका अभिनेता प्रथमेश याने साकारली होती आणि दगडू या पत्रामुळे प्रथमेशला भरपूर प्रसिद्धी मिळाली . त्यानंतर प्रथमेशचा टकाटक २ हा चित्रपट देखील खूप लोकप्रिय ठरला आता टाइमपास ३ आणि टकाटक २ या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रथमेशने थेट बोलीवूडमध्ये उडी मारली आहे. प्रथमेश परब हा बॉलीवूडचा लोकप्रिय चित्रपट दृश्यम २ मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

नुकताच अभिनेता अजय देवगनचा दृश्यम २ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे , या चित्रपटाच्या पहिल्या भाग खूप लोकप्रिय ठरला होता. पण दृश्यम २ या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपुरीच करण्यात आली होती. दृश्यम २ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दृश्यम २ हा चित्रपट दोन दिवसा पूर्वीच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगमध्येच तब्बल ३ कोटींची कमाई झाल्याची माहिती मिळाली आहे आणि चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाची १५ कोटींची कमाई झाली आहे. त्यामुळे दृश्यक २ या चित्रपटाची लोकप्रियता किती आहे हे सहज लक्षात येत.दृश्यम २ मध्ये प्रथमेश परब एक छोटीशी भोमिक साकारणार आहे. याची माहिती त्याने या आधी कोणालाही दिली नव्हती. पण नुकतीच झालेल्या दृश्यम २ च्या प्रीमियर सोहळ्याला प्रथमेशनं उपस्थिती लावली होती. तसेच सिनेमा रिलीज होताच त्यानं त्याच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाची घोषणा त्याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्याचा आणि अभिनेता अजय देवगणचा एकत्रित फोटो शेअर करत केली आहे.

प्रथमेश परबने त्याच्या अधिकृत खात्यावरील अभिनेता अजय देवगण बरोबरचा एकत्रित फोटो असलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर कॅप्शन दिला आहे . त्यात प्रथमेशने लिहिलं आहे की त्याने एक लहान पण अतिशय मनोरंजक व्यक्तिरेखा साकारली आहे आणि दिग्ग्जनसोबत स्क्रीन शेअर करणे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा असे प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना सम्बोधीत्कारून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे .

CISCO : मेटा, अॅमेझॉन नंतर सिस्को करणार ५ टक्के कर्मचार्‍यांची कपात

Bigg Boss 16: शालिन, टीना आणि एमसी स्टॅन यांना बिग बॉसचा धक्का ; पहा काय झालं

Latest Posts

Don't Miss